Thursday 6 October 2016

Hello Friends,

We have shifted our blog to the following web address:

www.shubhasurcreations.com/blog-shubhasur.html

Now onwards you will get to read posts from us on this mentioned portal.

Stay connected
Best regards,
ShubhaSur Creations
shubhasurcreations@gmail.com
www.facebook.com/ShubhaSur.Creations
plus.google.com/+Shubhasurcreations
www.linkedin.com/company/shubhasur-creations

Saturday 31 January 2015

वळणावर एका वेड्या


वळणावर एका वेड्या, मी अनाम शोधत काही,
शब्दांना बांधू पाहे, पण अर्थच साधत नाही.


डचमळते उरात वेगे, स्फुरण्याची वेडी ओढ,
पण वेड करंटे ऐसे, गुणधर्मा जागत नाही.


किंचितसा पुसट सुगावा, इच्छित अर्थाचा लागे,
पण सुतावरून स्वर्गाचा, सोपान अवतरत नाही.


जाऊ दे म्हणोनी दिधला, यत्नांनाही विश्राम
शारदापुत्र रुसलेले, वाग्मोती गवसत नाही


झटापट सोडून देता, अचानक झरली शाई
पंक्तींनी दिधली ग्वाही, प्रतिभा ही लोपत नाही!


- सुखदा

Wednesday 31 December 2014

Bedapaar

ShubhaSur's new music video

"Bedapaar"


Lyrics & Music: Sukhada Bhave-Dabke
Sung by: Parag Dabke
Camera: Nikhil Joshi

Special Thanks: Varun Damle, Aditya Bivalkar, Parikshit Kulkarni

Produced by: ShubhaSur Creations

Lyrics:

Nadaani
Kartein hain
Hum nikle hain
Bedaapaar ve
Duniyaki
Chaukatko
Hum jaise hain
Thokar maar ve

Kheechein humko daryaaki har mauj hai
Dikhta sirf parbatka sartaaj hai
Ragragmein ek pyaasa registaan hai
Nasnasmein unchisi udaan hai
Hatke kuch
Andaajonki
Ek chaahat bhi
Barkaraar ve

Sapnonki farmaaishonko dhoondh le
Havaaonko bhi anjaana ek mod le
Waqt se kuch lamhein chal udhaar le
Tufaanonse tharraati raftaar le
Manjhil ki
Khwaahish kar
Armaanonse
Giraftaar ve

- Sukhada

Tuesday 14 October 2014

Clean India - Chalo Re


Launching a special track on mission CLEAN INDIA!
CHALO RE!

Do watch and share to show your support.

Let's unite for a better India!


Lyrics - Sukhada Bhave-Dabke & Parag Dabke
Music & Voice - Sukhada Bhave-Dabke
Direction & Camera - Parag Dabke
Presented by - ShubhaSur Creations

Chalo re
Banaaye milke desh sunahara
Saath chalo
Ujale sapne ujala savera
Saath chalo

Chalo re
Desh sunahara ghar ye humara
Saath chalo
Ummeedonka khilta najara
Saath chalo
Chalo re
Saath chalo!


Wednesday 16 July 2014

Zee Marathi EL3G BG Song Vede Man With Lyrics




झी मराठी
"एका लग्नाची तिसरी गोष्ट" 

शब्द - श्रीरंग गोडबोले 
संगीत - सुखदा भावे-दाबके 
स्वर - जुईली जोगळेकर, जयंत पानसरे 

गिटार - अमोघ दांडेकर 
बासरी - वरद कठापुरकर


वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू

ये ना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू


माझी जाई तुझी जुई ओंजळीत फुले 

प्रेमाच्या ह्या सुगंधाने मन माझे न्हाले

तुझ्या डोळ्यातले स्वप्न लागे मला दिसू

वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू 


तुझ्या क्षणालाही नको दुःखाची झालर

तुझ्या माझ्या घरट्याला प्रेमाचे छप्पर

ओठांनी पुसेन तुझ्या डोळ्यातले आसू

वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू

ये ना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू

Wednesday 9 July 2014

विठ्ठल विठ्ठल


विठ्ठल विठ्ठल
चालला गजर 
भाविक हजर 
पंढरीला ।।

माउली गं श्रद्धा 
माऊलीची भक्ती 
माऊलीच शक्ती 
लेकराला ।।

आषाढीच्या दिनी
एवढे साकडे 
घालू तुझ्याकडे
बा विठ्ठला ।।

माऊली तुझी गं 
हवी कृपादृष्टी 
गांजलीये सृष्टी 
कलीयुगी ।।

हिरव्याची जागा 
काळ्याने घेतली 
वर्षाई रुसली 
सूखा आला ।।

दाव देवा काही 
यावर उपाय 
निघू देत पाय 
वृक्षारोपा ।।

नीती अनीतीची 
होऊ दे जाणीव 
नसू दे उणीव 
चांगुलकीची ।।

अच्छे दिन येण्या 
मिळू देत धीर 
पाठीशी खंबीर 
उभा ठाक ।।

- सुखदा 

Monday 7 July 2014

Nisargayan Concert Promo 01


नमस्कार,


'शुभसूर क्रिएशन्स'तर्फे आम्ही 'निसर्गायन-एक अनोखी प्रेमकहाणी' या नवीन गाण्यांच्या कार्यक्रमाची निर्मिती करीत आहोत.


'निसर्गायन' या नवीन प्रकाशित झालेल्या मराठी  म्युझिक अल्बमचं हा कार्यक्रम हे लाईव्ह स्वरूप आहे. ऋतूंमधून उलगडणारी एक अनोखी प्रेमकहाणी असलेला "निसर्गायन" हा अल्बम संगीतकार "सुखदा भावे-दाबके" हिने संगीतबद्ध केला आहे. यातील गीते पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर, कवयित्री शांता शेळके, विक्रांत देशमुख तसेच स्वत: सुखदा यांनी लिहिली असून ती गायली आहेत, श्रीरंग भावे आणि केतकी भावे-जोशी या तरूण गायक कलाकारांनी. तर निवेदन तक्षिल खानविलकर याने केले आहे. थीम स्वत: सुखदाचीच असून अल्बममधील निवेदनही तिनेच लिहिले आहे.


एक आगळीवेगळी थीम असलेल्या या अल्बममध्ये शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा अशा ६ ऋतूंना सुखदाने अत्यंत कल्पक धाग्याने गुंफले आहे. निसर्ग आपल्याच मनातल्या भावनेच्या प्रेमात पडतो आणि त्यांची ही प्रेमकहाणी, सहा ऋतू पूर्णत्त्वाला नेतात. हीच या कार्यक्रमाची वेगळी संकल्पना आहे.


निसर्ग आणि भावना यांची आगळीवेगळी प्रेमकहाणी असलेला "निसर्गायन" हा अल्बम सुखदाच्याच "शुभसूर क्रिएशन्स"ने रसिकांसमोर आणला आहे.

आता आम्ही घेऊन आलोय या अल्बमचा लाईव्ह कार्यक्रम! अल्बमला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आम्हांला खात्री आहे की हा कार्यक्रमही नक्कीच यशस्वी होईल. संकल्पनेला अजून जास्त खुलविण्यासाठी अल्बममध्ये असलेल्या मराठी गाण्यांव्यतिरिक्त काही हिंदी व ब्रज भाषेतील गाण्यांची यात भर घातली आहे. ही नवीन गाणी पराग दाबके आणि सुखदा यांनी लिहिलेली आहेत. आमचे दोन्ही गायक श्रीरंग-केतकी आणि निवेदक तक्षिल हा कार्यक्रम म्युझिक ट्रॅक्सवर अतिशय सहज सुंदररित्या रसिकश्रोत्यांसमोर सादर करतात. याचा पहिला यशस्वी (हाऊसफुल) प्रयोग दि. ८ जून २०१४ रोजी डोंबिवली(पू.) येथे शुभमंगल कार्यालयात संपन्न झाला. त्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचा प्रोमो सोबत जोडत आहोत. जरूर बघा आणि आम्हांला अभिप्राय कळवा.